पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग)- ग्लोबल व्हीजन फौंडेशनच्या वतीने २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या दरम्यान असलेल्या नेत्रदान पंधरवड्यानिमित्ताने नेत्रदानाची शपथ घ्या आणि मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबीर सांगवीच्या शितोळेनगर मधील नित्यसेवा आय रुग्णालय, आणि पिंपळे सौदागर येथील ग्लोबल आय इंस्टीट्यूट या ठिकाणी होणार असल्याची माहिती फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. बबन डोळस यांनी दिली.
ग्लोबल व्हीजन फौंडेशन संचलित सांगवी येथील नेत्र तज्ज्ञ डॉ बबन डोळस यांच्या पुढाकाराने
नुकतेच ग्लोबल फौंडेशनला राष्ट्रीय आरोग्य मानांकन संस्थेचे NABH हे गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे
डॉ.डोळस यांनी 2008 साली सुरू केलेली नेत्रपेढी हि पिंपरी चिंचवड परिसरातील पहिलीच पेढी ठरली.
राष्ट्रीय अंधत्व निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत अनेक मोफत नेत्र शिबीर व शस्त्रक्रिया शिबिरे राबवित आले.
या शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी सांगवी साठी ८८००६६८४५५ तर पिंपळे सौदागर परिसरातील नागरीकांनी 7378840004 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.