पीसीएमसी सायकलिस्ट सायक्लोथाॅन स्पर्धा २०२०

पिंपरी, दि. ३० ( punetoday9news):-     पिंपरी चिंचवड शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्याच्या उद्देशाने चालू करण्यात आलेल्या पीसीएमसी सायकलिस्ट क्लबच्या वतीने दि.२७ रोजी सायकलिंग आणि नेत्रदानासाठी लोकांना प्रेरणा मिळण्याच्या उद्देशाने सायक्लोथाॅनचे आयोजन करण्यात आले.

Audaux Club Parisian (France) यांच्या अधिपत्याखाली वेगवेगळ्या देशांमध्ये हा क्लब कार्यरत असून भारतात Audex India Randonneur (AIR) च्या परवानगीने पिंपरी चिंचवड शहरातही कार्य चालू आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावाने अतिशय सूत्रबद्ध रित्या त्याचे नियोजन केले होते. सर्व सुरक्षिततेची काळजी घेऊन व योग्य त्या परवानग्या घेऊन त्याचे नियोजन करण्यात आले होते .

५० किमी आणि १०० किमी अशा २ गटात ही सायक्लोथाॅन घेण्यात आली. दोन्ही गटात सध्याच्या साथी च्या पार्श्वभूमीवर फक्त ४० – ४० स्पर्धकांना भाग घेण्याची परवानगी देण्यात आली होती. स्पर्धकांचा उत्साह हा वाखाणण्यासारखा होता. प्रत्येक स्पर्धकास स्पर्धा पूर्ण केल्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र, पदक व मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

हा कार्यक्रम सायकलिस्ट आणि नेत्ररोग तज्ञ डॉ. बबन डोळस ( ग्लोबल आय इन्स्टिटयूट ) यांनी प्रायोजित केला होता. पीसीएमसी सायकलिस्ट या कल्बचे संस्थापक उत्कृष्ठ सायकलिस्ट व फिटनेस आयकॉन डॉ धनराज हेळंबे, डॉ.बबन डोळस, डॉ आदेश काळे, मयुर शानबाग, अंशुमन, सागर वाकडे, सिध्दगोंडा पाटील यांनी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.