निरोगी आरोग्यासाठी धावले डॉक्टर्स.

 

Doctors ran for healthy health.

पिंपरी: – मेडिफिट फौंडेशनच्या वतीने पिंपळे सौदागर कोकणे चौक येथे  डॉक्टरांसाठी आयोजित करण्यात आलेल्या फिटनेस मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मेडिफिट फाउंडेशन ही  डॉक्टर्स आणि त्यांच्या कुटूंबातील सदस्यांच्या फिटनेस साठी स्थापन केलेली नोंदणीकृत संस्था आहे. संस्थेचा पहिला कार्यक्रम म्हणून डॉक्टरांसाठी फिटनेस रन कम मॅरेथॉन चे आयोजन केले होते .

त्याला डॉक्टर्स नी उत्तम प्रतिसाद दिला . ५ किमी , १०किमी आणि २१ किमी अशा तीन गटात  या मॅरेथॉन चे आयोजन केले होते. या मॅरेथॉनमध्ये सुमारे सव्वाशे डॉक्टर्स सहभागी झाले होते.

सहभागी सदस्यांना टी शर्ट , पदक, ऑनलाईन प्रमाणपत्त  देण्यात आले . स्पर्धे दरम्यान हैड्रेशन पॉईंट्स तसेच स्पर्धेअंती रुचकर असा नाश्ता व चहा देण्यात आला .

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ग्लोबल आय फाउंडेशनचे संचालक डॉ. बबन डोळस यांचे विशेष सहाय्य लाभले .

आजच्या मेडीफिट फिटनेस रन च्या नियोजनामध्ये खालील सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी होण्यामध्ये महत्त्वाचा वाटा उचलला – डॉ. धनराज हेळंबे , डॉ. विवेक बोंडे , डॉ. चेतन पटेल, डॉ. प्रशांत पाटील , डॉ. अनिकेत अमृतकार , डॉ. पद्मनाभ केसकर , डॉ. प्रवीण कोकाडे  , डॉ. राजाराम खिलारी

मेडिफिट फौंडेशन चे ध्येय दर महिन्याला डॉक्टरांसाठी एक स्पोर्ट / फीटनेस इव्हेंट चे आयोजन करणे हे आहे तसेच सदस्यांना या क्षेत्रातील एक्स्पर्ट चे मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा आहे .

डॉक्टरांची बैठी जीवनशैली असल्याने , व्यायामाचा  अभाव  असल्याने तसेच अनेक मानसिक ताणतणाव असल्याने ते अनेक व्याधीचे शिकार होतात म्हणून या फौंडेशन चा उद्देश वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये फिटनेससाठी जनजागृती करणे हा हेतू असल्याचे डॉ डोळस यांनी सांगितले.